पटियाला हाउस न्यायालयाचा रॉबर्ट वाड्रांंना दिलासा

टीम महाराष्ट्र देशा : गेली अनेक दिवस ईडी कार्यालयाच्या खेट्या घालणारे गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना दिल्लीच्या पटियाला हाउस न्यायालयाने 19 मार्च पर्यंत अटक करण्यास मज्जाव घातला आहे. त्यामुळे अटकेपासून संरक्षण मिळाल्याने रॉबर्ट वाड्रा यांना दिलासा मिळाला आहे.

रॉबर्ट वाड्रा यांनी लंडन मध्ये 1.9 दशलक्ष किंमतीची मालमत्ता खरेदी केली असून त्या संबंधीत माहिती आपल्या विवरण पत्रात दिलेली नव्हती. या कारणावरून रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर ईडी ने रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान वाड्रा यांनी कोर्टात जामीन अर्ज केला होता. या प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांना आधीही कोर्टाकडून तात्पुरता अटकपुर्व दिलासा मिळाला आहे. वाड्रा यांचा जामीन अवधी शनिवारी संपणार होता. पण वाड्रा यांनी अर्ज देऊन मुदत आणखी वाढविण्याची विनंती केली होती. या प्रकरणात ईडीकडून वाड्रा यांची सात वेळा विचारपूस करण्यात आली आहे. वाड्रांच्या विरोधात जमीन गैरव्यवहार प्रकरणात वेगवेगळे गुन्हे स्वतंत्रपणे नोंदवण्यात आले आहेत.