पतंजलीच्या मिल्क बार चॉकलेटमध्ये आढळले किडे

ठाणे : पतंजलीच्या मिल्कबार चॉकलेटमध्ये किडे आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. माझ्या एका मित्राने माझा मुलासाठी टिटवाळा येथील एका दुकानातून पतंजलीचे मिल्कबार चॉकलेट आणले होते. माझा मुलगा माऊली चॉकलेट खात असताना त्यात किडे आढळून आले.

बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उत्पादनावर आमचा विश्वास होता. मात्र या घटनेमुळे आम्हाला धक्का बसला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे चेतन देवरे यांनी सांगितले. पतंजलीच्या उत्पादनात अशा प्रकारची घटना उघडकीस आल्याने पतंजलीची उत्पादने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.

You might also like
Comments
Loading...