योगी सरकारचा रामदेव बाबांना दणका; पतंजली फूड पार्क दुसऱ्या राज्यात हलवावं लागणार

नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांना उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारकडून दणका बसला आहे. ग्रेटर नोयडामध्ये बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ला मेगा फूड पार्कसाठी देण्यात आलेली जमीन रद्द करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. त्यामुळे पतंजली फूड पार्कला आता दुसऱ्या राज्यामध्ये प्रकल्प शिफ्ट करावा लागणार आहे. पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

‘उत्तर प्रदेश सरकारने जमीन देण्याचा निर्णय रद्द केला आहे, या सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचं जीवन बदलवणारा हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही, आता हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात हलवण्यात येईल’, अशी माहिती बालकृष्ण यांनी ट्विटरद्वारे दिली.