रामदेव बाबांना योगी सरकारचा दिलासा; पतंजली फूड पार्क उत्तरप्रदेशमध्येचं होणार

नवी दिल्ली : ग्रेटर नोयडामध्ये बाबा रामदेव यांच्या नियोजित ‘पतंजली’ मेगा फूड पार्कसाठी देण्यात आलेली जमीन रद्द करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला असल्याचं वृत्त होतं. यावरून पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच ‘पतंजली’ मेगा फूड पार्क दुसऱ्या राज्यात हलवण्याची घोषणा देखील केली होती.

मात्र आता पतंजलीने आपला सहा हजार कोटींचा फूड पार्क उत्तर प्रदेशाबाहेर नेण्याची घोणषा करताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना फूड पार्कचं काम वेगवान गतीने करण्याचा आदेश दिला आहे.बालकृष्ण यांनी पतंजलीने फूड पार्क प्रोजेक्टसाठी राज्य सरकारकडून योग्य ती मदत मिळत नसल्याचा आरोप करत प्रोजेक्ट राज्याबाहेर नेण्याचं जाहीर केलं होतं. यानंतर योगी आदित्यनाथ यांनी रामदेव बाबांशी चर्चा केली. लवकरच औपचारिकता पूर्ण केल्या जातील अशी माहिती पायाभूत सुविधा व औद्योगिक विकास मंत्री सतीश महाना यांनी दिली आहे.