पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार तर, स्टीव्ह स्मिथ?

पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार तर, स्टीव्ह स्मिथ?

Pat Cummins

कानपूर : जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सची (Pat Cummins) ऑस्ट्रेलियाचा 47 वा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) च्या पाच सदस्यीय पॅनेलने घेतलेल्या बैठकीनंतर कमिन्सची नवीन कसोटी कर्णधार आणि स्मिथची उपकर्णधार म्हणून निवड केली आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा पहिला वेगवान गोलंदाज आहे ज्याला संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद मिळाले आहे.

28 वर्षीय खेळाडू आता टीम पेनची जागा घेणार आहे, ज्याने गेल्या आठवड्यात कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. पेनने गेल्या आठवड्यात आपल्या सहकारी महिला जोडीदाराला अश्लील संदेश पाठवल्यानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. पेनने महिला सहकाऱ्याला अश्लील फोटो आणि अश्लील संदेश पाठवल्याबद्दल खेद व्यक्त करत कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. हे प्रकरण 2017 चे आहे आणि त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चौकशीत त्याला क्लीन चिट दिली होती.

दरम्यान, वेगवान गोलंदाज कमिन्सने फेब्रुवारीपासून एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडिज आणि बांगलादेशमधील मर्यादित षटकांचे दौरे वगळता तो आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) च्या दुसऱ्या टप्प्यात खेळला नाही, परंतु तो T20 विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाच्या सर्व सामन्यांमध्ये खेळला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील एशेस मालिका ८ डिसेंबरपासून गाबा येथे खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन ऍशेस कसोटीसाठी 15 जणांचा संघ निवडला आहे.

महत्वाच्या बातम्या: