नरककुंडाची प्रचीती घ्यायची असेल तर जेऊर रेल्वेस्थानकावर या

jeur ralway

गौरव मोरे /प्रतिनिधी जेऊर:सोलापूर विभागात दौंड आणि कुर्डूवाडी नंतर वार्षिक कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या जेऊर रेल्वेस्थानकात सोयी-सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्याप्रमाणावर गैरसोय होत असून अक्षरशः नरककुंडाची आठवण यावी अशी परिस्थिती जेऊर रेल्वे स्थानकावर आहे

Loading...

सैराट सिनेमामुळे सर्वत्र प्रसिद्धीस आले करमाळा तालुक्यातील जेऊर हि मोठी बाजारपेठ आहे. करमाळा शहर व परिसरासाठी जेऊर हे मध्यवर्ती ठिकाण आहे, तालुक्यातील नागरिक जेऊर रेल्वेस्थानकावरून विविध कामे व प्रवासानिमीत्त सोलापूर,पूणे,मुंबई व अन्यत्र रेल्वेने ये जा करतात.येथुन दररोज ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु त्यांना येथील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे

shauchalay.रेल्वेस्थानकावर निवारा,पिण्याचे पाणी, शौचालय आदी सुविधांची गरज असते.परंतु येथे प्रामुख्याने याच सोयींचा अभाव आहे. येथे नविन प्लाटफॉर्म बांधण्यात आला आहे मात्र , निवारा शेडची उभारणी करण्यात आलेली नाही.गाड्यांची वाट पाहत थांबणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी पुरेसे बाकडे ही नाहीत. प्रतिक्षालय तर केव्हाच बंद पडले आहे.पिण्याच्या पाण्याची नळांची दुर्दैशा झाली आहे.येथे दहा ते पंधरा नळ आहेत. मात्र, त्यापैकी एकही नळ चालू नाही.प्रवाशांच्या तुलनेने नळांची संख्या अपुरी असून नळ बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथे बांधण्यात आलेले शौचालय कित्येक वर्षांपासून बंद पडलेले आहे.त्यामुळे प्रवाशांची जास्ततर स्त्रीयांची कुचंबणा होत आहे.डुकरांचा देखील त्रास मोठ्याप्रमाणावर नागरिकांना आणि प्रवाश्यांना सहन करावा लागत असून डुक्कर कधी हल्ला करेल आणि चावा घेईल याची शाश्वती कोणीच देवू शकत नाही .

jeur ste

जेऊर रेल्वेस्थानकावरील उपहार गृह बंद असल्याने प्रवाशांना जेवणाची, नष्ट्याची,गैरसोय होत आहे.प्रवाश्याकडून  जबरदस्तीने पैसे मागणे, शिव्या देणे.आरडाओरडा करणे तसेच दारू पिऊन प्रवाशांना बसण्यासाठी केलेल्या बाकांवर झोपणे असे प्रकार तळीरामांकडून होत आहेत .कहर म्हणजे एखाद्याने  पैसे न दिल्यास त्यांना शिवीगाळ करणे या सारखे प्रकार घडत असताना रेल्वे प्रशासन मात्र सुस्त आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता ते दुर्लक्ष करीत आहेत.

Aqua_Speed_20151206_104616

जेऊर रेल्वेस्थानकातून दरमहा सरासरी ऐंशी ते नव्वद हजार प्रवाशी प्रवास करतात.यातून रेल्वेला सुमारे पंधरा ते वीस लाखांचे उत्पन्न मिळते. प्रवाशांची वर्दळ असताना आणि त्यातून भरपूर उत्पन्न मिळत असताना रेल्वेप्रशासन या स्थानकावर पुरेशा सोयी निर्माण करुन देण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.रेल्वे स्टेशनवर भिकाऱ्यांचा तसेच वावर वाढला असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

जेऊर परिसरातील नागरिकांनी रेल्वेस्थानकाच्या दुरावस्थेकडे लक्ष घालण्याची विनंतीप्रशासनाला केली होती.परंतु अद्याप काहीच हालचाल दिसत नाही.प्रशासनाने लवकरात लवकर या समस्या सोडवाव्यात – भूषण लुंकड ( प्रवासी )

 Loading…


Loading…

Loading...