‘पळशीची पीटी’ ट्रेलर प्रदर्शित

blank

टीम महाराष्ट्र देशा कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीचे नाव उंचावलेला ‘पळशीची पीटी…गोष्ट हरवलेल्या प्रत्येकाची’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सवामध्ये आपली छाप सोडली आहे. येत्या २३ ऑगस्ट ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन धोंडिबा कारंडे यांनी केले आहे. ‘लागिर झालं जी’ मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकलेले जयडी (किरण ढाणे) आणि राहुल्या (राहुल मगदूम) हे या चित्रपटा मध्ये मुख्य भूमिकेत दिसतील.

चित्रपटा मध्ये साताऱ्यातील पळशी गावामधील भागी आणि विकास या दोन प्रमुख पात्रांची कहाणी या चित्रपटा मध्ये मांडली आहे. भागीची स्वता:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीची धडपड, या धडपडीत तिला कोणी मदत केली आणि कोणी नाही हे दाखवले आहे. तिच्या या स्वप्नांवर पूर्ण चित्रपट आधारित आहे.

या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान दिला आहे. त्याच सोबत संस्कृती कलादर्पण, गोवा मराठी चित्रपट महोत्सव, पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि आंतराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवामध्ये देखील या चित्रपटाने आपली कला सादर केली.