ढेकूळ कुट्ट्यांनो, मतदान जातीवर नाही, तर धोरणावर करायचे असते : पाशा पटेल

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. श्री सिध्दरामेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सभा घेतली. यावेळी मतदान जातीवर नाही, तर धोरणावर करायचे असते. तुम्हीही बाजार समितीच्या निवडणुकीत जातपात न बघता मतदान करा, असे आवाहन पटेल यांनी केले.

पाशा पटेल यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

– मी मुसलमान. माझा आजा शेतकरी, माझा बाप शेतकरी. मी पण शेतकऱ्यांसाठी काम करतोय.

-पूर्वी सोसायटीच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार होता.आता तुमचं प्रमोशन झालंय. सुभाषबापूंनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला.

-या मार्केट कमिटीमध्ये बोक्यांचं मतदान बंद झालंय. आता जो घाम गाळतोय, ज्याचा माल विकतोय, त्या विकणाऱ्याला पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालाय.

-लोकशाहीचे शुध्दीकरण सुरु झाले आहे. आता बोके गरिबांची जिरवतेत की गरीब बोक्यांची जिरवतेत हे या निवडणुकीतून लक्षात येणार आहे.

You might also like
Comments
Loading...