fbpx

शरद पवारांची नियतच खोटी – पाशा पटेल

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी संपाला पाठींबा दिलाय. मी एक शेतकरी असल्याने संपाला पाठींबा देतोय. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतं नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी असं पवार यांनी म्हंटलं होतं.

दरम्यान शरद पवार यांच्या या वक्तव्याचा राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चांगलाचं समाचार घेतलाय. शरद पवारांची नियतच खोटी आहे. दहा वर्षे देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेऊन आयपीएलमध्ये गुंतलेले शरद पवार सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकऱ्यांना भडकावण्याचा घृणास्पद प्रकार करत असल्याचं त्यांनी म्हंटलं.

तसेच सध्याच्या सरकारची नियत कशी आहे, याचे मोजमाप करण्यापूर्वी शरद पवार यांनी आपण इतकी वर्षे शेतकऱ्यांच्या नावाने मतं मिळवून सत्ता भोगली तरी, शेतकऱ्यांची अवस्था अशी का झाली, याचं आधी उत्तर द्यावं, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.