fbpx

संविधानाच्या नावाखाली ‘पक्ष बचाव’ आंदोलन : रामदास आठवले

मुंबई : विरोधकांकडून प्रजासत्ताक दिनी संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र रामदास आठवले यांनी संविधान बचाव रॅली काढणारे ‘पक्ष बचाव’ आंदोलन करत आहे अशी टीका केली.

शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत संविधान बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह सामाजिक व संविधानप्रेमी यांच्यातर्फे संविधान बचाव संविधान रॅली आयोजित करण्यात आली. या बचाव रॅली मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली आहे.

रामदास आठवले म्हणाले, जोपर्यत मी केंद्रात मंत्री आहे तोपर्यंत संविधान आणि आरक्षणाला हात लावू देणार नाही. येत्या २६जानेवारीला काहींनी संविधान रॅली काढण्याचे ठरविले आहे. परंतु, ही रॅली त्यांचे पक्ष वाचविण्यासाठी आहे. संविधानाच्या नावाखाली ‘पक्ष बचाव’ आंदोलन करण्यात येत आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी केली.