भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा पक्ष – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : भारतात दोन समाजात तेढ निर्माण करून दंगली घडवल्या जातील, युद्ध लादून सैनिकांना शहीद करण्याचे कामदेखील होईल. यातून आम्ही शांतता राखण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र भाजपा निर्माण करेल. कारण भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा पक्ष असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. धनगर आरक्षणासंदर्भात आयोजन झालेल्या मेळाव्यासाठी आंबेडकर पंढरपूर येथे बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुकाबला फक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेच करू शकतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आणखी राजकीय शिक्षणाची गरज आहे. काँगे्रसला पुन्हा सत्तेत यायचे असेल, तर लहान पक्षांना सोबत घ्यावे लागेल. मात्र, त्यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीत त्याचा बोध घेतल्याचे दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष बदलत नसेल, तर तिसरा पर्याय निर्माण होईल. कर्नाटक येथील काँग्रेस व जेडीएस यांचे सरकार स्थिर राहणार नाही. पुढील तीन महिन्यांमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. अस देखील ते म्हणाले.