पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांना निवडणूक आयोगाकडून दणका

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी पक्षाचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार आणि रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांना आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात विना परवानगी सोशल मीडियावर जाहिरात पोस्ट केल्याने सुनील तटकरे यांना आचार संहिता भंगाची नोटीस पाठवण्यात आली आहे तर पार्थ पवार यांनी पेड न्यूज केल्याने त्यांना खुलासा करण्या बाबत निवडणूक आयोगा कडून नोटीस मिळाली आहे.

मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार ‘पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा क्षेत्र दौरा’ ही बातमी व ‘पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ गाव दौऱ्यांना सुरुवात’ ही एकसारखी बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या दोन्ही बातम्या पेड न्यूजमध्ये मोडत आहेत. या बातमीचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट का करू नये असा खुलासा उमेदवारास विचारून कार्यवाहीचा अहवाल माध्यम सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीला लवकरात लवकर पाठवावा. याबाबत पार्थ पवार यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

Loading...

तसेच खेडचे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गौसभाई खतीब यांनी फेसबुक या सोशल साईटवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मतदान करण्याचे आवाहन मुस्लिम समाजातील बंधू भगिनींना केले आहे. विशिष्ट समाजाला, जातील उद्देशून आवाहन करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. या कारणास्तव खतीब याना दापोली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस पाठवली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी