fbpx

आजोबांना पंतप्रधान करायचंय;पार्थ पवारांचा आशावाद

पुणे : आपल्या पहिल्या भाषणामुळे सोशल मिडीयावर ट्रोल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढविताना चक्क “आपल्याला आजोबांना (शरद पवार) पंतप्रधान करायचंय, तेच ध्येय आपल्याला ठेवायचंय”असं म्हटलं आहे.

पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथील सभेत बोलताना पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान बनवण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान,दस्तुरखुद्द शरद पवार यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

पार्थ पवार नेमके काय म्हणाले?

“सगळे एकत्र मिळून निवडणुकीत काम करु. मतभेद असतील, ते विसरुन जाऊया. आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचंय. तेच आपल्याला ध्येय ठेवायचंय.”

दरम्यान,मावळ लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा चिंचवड नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात पहिल्यांदाच पार्थ पवार भाषणास उभे राहिले आणि कागदावर लिहून आणलेले भाषण अडखळत वाचून दाखविले.या नंतर सोशल मिडीयावर पार्थ याची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. आता आजोबांबद्दल केलेलं हे वक्तव्य देखील मोठ्या चर्चेचा विषय बनत आहे.