मावळच्या बेरोजगारीवर लवकरच तोडगा काढणार : पार्थ पवार

blank

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार हे सक्रीय चांगलेच सक्रीय झाले असून त्यांनी आज इंटक युनियनच्या प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्या आयोजित करण्यात आलेल्या मिटिंगमध्ये संवाद साधताना मावळ मधील बेरोजगारी या विषयला हात घातला असून लवकरच मावळ मध्ये अनेक कंपन्या आणून रोजगाराच्या संधीत वाढ करणार असल्याच आश्वासन दिले आहे.

यावेळी पार्थ पवार म्हणाले की, मावळमध्ये अनेकानेक कंपन्या आणून येथील स्थानिक लोकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणार आहे. कंपनी आणि कामगार यांच्यात समन्वय साधून कामगारांचे सगळे प्रश्न सोडवले जातील, तसेच भाजप सरकारने मागील पाच वर्षात भारताची अर्थव्यवस्था बिघडवली आहे. आपल्या देशावर 40 लाख कोटी इतकं कर्ज होत. मात्र, भाजपच्या काळात हेच कर्ज 80 लाख कोटी इतकं झालं आहे. मागील पाच वर्षात नोटबंदी, जीएसटी यासारख्या गोष्टी आल्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला झाला. शिवाय याचा फटका कंपन्यांना देखील बसला आहे. असे सांगत पार्थ यांनी यावेळी भाजपला देखील लक्ष केले.

पुढे पार्थ म्हणाले की, कामगारांच्या बाजूने प्रश्न मांडून तोडगा काढणार आहे. तसेच कंपन्यांची देखील बाजू कामगारांसमोर मांडणार आहे. बाहेर राज्यातील कंपन्या मावळात येतील, असे प्रयत्न करणार असून त्यासाठी आपली साथ असावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, मावळ मधून कॉंग्रेस आघाडीकडून पार्थ पवार हे रिंगणात उतरले आहेत तर युती कडून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे पार्थ पवार यांना टक्कर देणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक राज्यातील एक लक्षवेधी लढत ठरणार आहे. पण पार्थ पवार आणि सहकारी यांनी रोजगारासारख्या प्रश्नाला हात घातल्याने पार्थ पवार यांची लोकप्रियता मतदार संघात चांगलीच वाढत आहे.