आजोबांकडून ग्रीन सिग्नल येताच पार्थ पवार लागले कामाला, आज एकविरा देवीच्या दर्शनाने सुरुवात

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेत मावळातून पार्थ पवार यांना ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी होकार मिळताच पार्थ कामाला लागल्याचं पहायला मिळत आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुलासाठी भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांकडून आग्रह होत असल्याने माढ्यातून लढण्यास होकार दिला होता. मात्र दुसरीकडे मावळमधील नेत्यांकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. दरम्यान, पार्थच्या उमेदवारीला आधी नकार देणाऱ्या शरद पवार यांनी आता स्वतः माघार घेत नातवाला संधी दिली आहे.

पार्थला उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाल्यावर अजित पवार यांनी पनवेलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तसेच ते मावळमध्ये देखील नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार. तर पार्थ पवार हे आज एकविरा देवीचे दर्शन घेवून प्रचाराला सुरुवात करणार आहेत.