मावळात राष्ट्रवादीला ‘मनसे’ साथ , पार्थ पवारांनी घेतली महाराष्ट्र सैनिकांची भेट

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपविरोधात प्रचार करा असा खुला आदेश दिल्यानंतर आता मनसे आणि राष्ट्रवादीतील जवळीकता आणखी वाढू लागली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे बहुचर्चित उमेदवार पार्थ पवार यांचा मनसेच्या चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे सत्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पिंपरी चिंचवड शहराअध्यक्ष हेमंत डांगे यांच्या निवासस्थानी मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित दादा पवार यांची भेट घेतली. यावेळी चिंचवड विभाग अध्यक्ष महेश येवले,अक्षय नाळे,रुपेश पाटस्कर आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान,मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार ‘पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा क्षेत्र दौरा’ ही बातमी व ‘पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ गाव दौऱ्यांना सुरुवात’ ही एकसारखी बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या दोन्ही बातम्या पेड न्यूजमध्ये मोडत आहेत. या बातमीचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट का करू नये असा खुलासा उमेदवारास विचारून कार्यवाहीचा अहवाल माध्यम सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीला लवकरात लवकर पाठवावा. याबाबत पार्थ पवार यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.