पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत; अंधश्रद्धा पसरवणाऱ्या धर्मगुरूंची घेतली भेट

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू पार्थ पवार सध्या जोरदार चर्चेत आहेत. पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांची पराचाराची जोरदार तयारी चालू आहे पण हि तयार करताना पार्थ पवार अतिउत्साहात येवून गडबड करताना दिसत आहेत.

पार्थ पवार हे त्यांच्या पहिल्या सभेमुळे चर्चेत होते. तर त्यानंतर ते सोशल मिडीयावर ट्रोल होताना दिसले. आता ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पवार यांनी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या धर्मगुरूंची भेट घेतली त्यामुळे ते पुन्हा एकदा टीकेची धनी ठरले आहेत.

दापोडीतील विनियार्ड चर्चे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे यांची पार्थ पवारांनी भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. या दोघांच्या भेटीचा एक व्हिडीओ सध्या व्ह्यारक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी पास्टर यांनी ‘तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात’ असे आशीर्वादही दिले. दरम्यान, असाध्य रोगांवर उपचार करत असल्याचा फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे दावा करतात. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते.

काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी पळतच सभेच्या ठिकाण गाठले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पनवेल मध्ये सभेसाठी जायला उशीर होत असल्याने पार्थ पवार यांनी चक्क पळत हा परिसर गाठल्याच सांगण्यात येत आहे. मात्र ज्या सभेसाठी पार्थ पवार पळत होते मुळात तिथे सभाचं होणार नसल्याच नंतर समोर आले आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सकाळच्या वेळेस लोकलमधून उलटा रेल्वे प्रवास करुन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे नेटकरी मंडळी पवार यांनी रिकाम्या डब्यातून प्रवास करून नक्की कोणत्या समस्या जाणून घेतल्या असे ट्रोल केले होते.