‘सभा नसताना धावपळ कशाला’ पार्थ पवार होत आहेत पुन्हा ट्रोल

टीम महाराष्ट्र देशा : यंदाच्या निवडणुकीत पार्थ पवार यांना आघाडी कडून मावळ मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मावळ मतदार संघात पार्थ पवार कार्यकर्त्यांना हाताशी घेवून मतदारसंघ पिंजून काढत आहेत.पार्थ पवार यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने पार्थ पवार अतिउत्साहात येवून गडबड करताना दिसत आहेत. सभेसाठी उशीर होत होता म्हणून पार्थ पवार यांनी पळतच सभेच्या ठिकाण गाठले असल्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

बुधवारी रात्री पनवेलमधील मोहल्ला परिसरात पार्थ पवार प्रचारासाठी येणार होते. यावेळी ते मुस्लिम मोहल्ल्यातील नागरिकांची भेट घेणार होते. पनवेल मध्ये सभेसाठी जायला उशीर होत असल्याने पार्थ पवार यांनी चक्क पळत हा परिसर गाठल्याच सांगण्यात येत आहे. मात्र ज्या सभेसाठी पार्थ पवार पळत होते मुळात तिथे सभाचं होणार नसल्याच नंतर समोर आले आहे.

तर दुसरीकडे रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बुधवारी सकाळी पार्थ पवार यांनी सीएसएमटीवरुन पनवेल असा लोकलने प्रवास केला होता. नोकरदार वर्ग हा सकाळच्या वेळेस पनवेलवरुन सीएसएमटीकडे मोठ्या प्रमाणात जात असतो . त्यावेळी डब्बा गर्दीने भरलेला असतो. मात्र पार्थ यांनी सकाळच्या वेळेस लोकलमधून उलटा रेल्वे प्रवास करुन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे नेटकरी मंडळी पार्ट पवार यांनी रिकाम्या डब्यातून प्रवास करून नक्की कोणत्या समस्या जाणून घेतल्या असे ट्रोल करत आहेत.