मावळ मतदार संघातील ‘या’ घडामोडी पाहून पार्थ पवार यांची झोप उडू शकते

टीम महाराष्ट्र देशा – महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला युतीतील घटपक्ष असणाऱ्या भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांनी विरोध दर्शवला होता.मात्र आता अखेर या दोन नेत्यांमध्ये दिलजमाई झाली आहे. या दोन नेत्यांच्या एकत्रित येण्यामुळे राष्ट्रवादी आणि मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासमोरील आव्हान आणखी कठीण बनले आहे.

मावळमध्ये शिवसेनेचे नेते श्रीरंग बारणे आणि आमदार जगताप यांच्यामधून विस्तवसुद्धा जात नव्हता असे चित्र होते. मावळमधून महायुतीचा उमेदवार विजयी करायचा असा चंग बांधलेल्या मुख्यमंत्र्यांनी अखेर या दोन्ही महारथी नेत्यांमध्ये समेट घडवून आणला.त्यामुळे मावळमध्ये भाजप आणि शिवसेना एकदिलाने लोकसभा लढण्यास सज्ज झाल्याने बारणे यांचा विजय पक्का मानला जाऊ लागला आहे.

Loading...

दरम्यान, अजित पवार यांनी सुपुत्र पार्थसाठी सर्वदूर प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे. पार्थची आई सुनेत्रा पवार, वडील अजित पवार, भाऊ जय पवार आणि चुलत भाऊ रोहित पवार आणि अजित पवार यांची बहीण हे सर्व पिंपरी-चिंचवड मध्ये बैठका घेत असून पार्थचा प्रचार करत आहेत. यावरून पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. आता हि मेहनत किती कामात येते हे निवडणूक झाल्यानंतरचं समजेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'