fbpx

माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या भविष्यात सुधारण्याचा प्रयत्न करेल – पार्थ पवार

टीम महाराष्ट्र देशा : मावळ लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी दारुण पराभव केला आहे. त्यानंतर पार्थ पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

“सुरुवातील माझ्या सर्व मतदारांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. या प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या लहान थोर व्यक्तींनी मदत केली. त्या सर्वांचे देखील आभार मानतो. आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या भविष्यात सुधारण्याचा प्रयत्न करेन. मोदी सरकारला जनतेने स्वीकारले आहे. निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांचे मनापासून अभिनंदन.” अस पार्थ पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, पवार घराण्यातील तिस-या पिढीचे पार्थ पवार यांना राजकारणातील सुरुवातीलाच पराभवाला सामोरे जावे लागल आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून तब्बल दोन लाख 17 हजार 763 मतांनी पार्थला पराभव पहावा लागला. पवार घराण्याला देखील पहिलाच आणि एवढ्या मताने पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी पवार घराण्याला पराभवाची चव चाखायला लावली.