fbpx

पादचारी पुलाचा भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेनं येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे. आज सकाळी 7.35 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये २ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, अग्निशमन दल आणि पश्चिम रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून कोसळलेल्या पुलाचा ढिगारा बाजूला काढण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे पूल कोसळल्यानं हार्बर मार्गावरील वाहतूकही थांबवण्यात आली आहे. अंधेरी स्टेशनच्या दक्षिण दिशेला असलेला हा पूल पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा आहे. पुलाचा भाग कोसळल्यामुळे ओव्हर हेड वायरमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पूल कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, याचा फटका मुंबईकरांना बसला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच लोअर परेल स्थानकावर देखील अशीच घटना घडली होती त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. सकाळच्या वेळेस हा पूल कोसळल्याने जास्त गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

पुणे शहरातील वाहतुकीत बदल

मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

2 Comments

Click here to post a comment