राज्यात पोपट, कावळे, बगळे मरतायत फक्त महाविकास आघाडी सुरक्षित; प्रविण दरेकरांची टीका

रायगड:- देशासह राज्यात कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याने आता अधिक चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू होत असल्याने राज्य सरकारने त्या संदर्भातील उपाययोजना सुरु केल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात माणसं सुरक्षित नाहीत, पक्षी सुरक्षित नाहीत. राज्यात पोपट मरतायत, कावळे, बगळे, अनेक पशु पक्षी देखील मरायला लागलेत. या राज्यात माणसं सुरक्षित नाहीत फक्त महाविकास आघाडी सुरक्षित आहे, असा टोला प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे. राज्य सरकारनं सुरक्षेच्या कवचातून बाहेर यावं आणि जनतेसाठी काम करावं, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

तसेच आमची सुरक्षा काढली तरी हरकत नाही. आम्ही राज्यभर जनतेत फिरत राहणार, आमच्यावर दबाव आणला तरी फरक पडणार नाही. मात्र, राज्यातील जनतेच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं, सुरक्षा कपातीसारख्या राजकीय उठाठेवी करण्यापेक्षा जनतेच्या हिताकडं लक्ष द्यावं, असंही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या