मनोहर पर्रीकर हे गोचीडीसारखे खुर्चीला चिटकून बसले आहेत, कॉंग्रेस नेत्याचा घणाघात

टीम महाराष्ट्र देशा : मनोहर पर्रीकर हे गोचीडीसारखे मुख्यमंत्रीपदाला चिकटून बसले असल्याची टीका काँग्रेस नेत्याने केली आहे. आपली खुर्ची जाऊ नये म्हणून पर्रीकर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राफेल सौद्यावरून ब्लॅकमेल करत असल्याचाही आरोप या नेत्याने केला आहे. या आरोपांमुळे देशाच्या राजकारणात नवं वादळ उठलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते जयपाल रेड्डी हे काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मडगावमध्ये काढण्यात आलेला या मोर्चा संपल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना रेड्डी यांनी आजारी असलेल्या पर्रीकरांवर टीका केली आहे.

पर्रीकर आजारी असूनही ते मुख्यमंत्रीपदाला चिकटून बसले आहेत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल सौद्यावरून ब्लॅकमेल करत या खुर्चीवर कायम राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं रेड्डी यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. आजारी असूनही पर्रीकर मुख्यमंत्री पद सोडत नसल्याने गोव्याच्या प्रशासनावर वाईट परिणाम झाला असल्याचं रेड्डींचं म्हणणं आहे.

You might also like
Comments
Loading...