fbpx

‘पर्रिकर म्हणाले, अंबानींसाठीच मोदींनी खेळ रचला’

टीम महारष्ट्र देशा – राफेल करार प्रकरणात पंतप्रधान मोदींनी अनिल अंबानी यांना फायदा करून देण्यासाठीच हा खेळ रचला असल्याचे पर्रीकर यांनी आपल्याला सांगितले असल्याचा दावा राहुल गांधीनी केला आहे. राफेल करार प्रकरणात पर्रिकरांचा यात काहीच सहभाग नव्हता असे त्यांनी आपल्याला सांगितले असल्याचेही राहुल गांधी म्हणले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली होती. राहुल गांधीनी पर्रीकर यांची भेट घेतल्यानंतर पुढील कार्यक्रमांसाठी उशीर होत असल्याचे कारण सांगत पत्रकारांशी बोलण्याचे टाळले होते.

त्यानंतर त्यांनी केरळच्या कोच्चीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींवर टीका केली आहे. यावेळी गांधी म्हणाले की, मित्रांनो गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मला सांगितले की, नव्या राफेल डीलशी माझा काहीही संबंध नाही. नरेंद्र मोदींनी अनिल अंबानीला फायदा मिळवून देण्यासाठी हा सर्व खेळ केला आहे.

पर्रिकर हे खुपच साधे-सरळ व्यक्ती असून त्यांच्यासारख्या नेत्याची देशाला आणि गोव्याला अत्यंत गरज असल्याचे मतही राहुल यांनी यावेळी व्यक्त केले होते.