पारनेर : विधानसभा निवडणुकीसंदर्भात निलेश लंके यांनी केली ‘ही‘ मोठी घोषणा

पारनेर /स्वप्नील भालेराव :  शिवसेनेसोबत बिनसल्यानंतर युवानेते निलेश लंके कोणत्या पक्षात जाणार याबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने लंके राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र निलेश लंके यांनी जी भूमिका सध्या घेतली आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या वृत्तपत्रांच्या  माध्यमातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कळपात गेल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत.माझी अजित पवार यांच्या बरोबर बंद खोलीत चर्चा झाली व माझा एनसीपीतील प्रवेश निश्चित झाला या ज्या वावड्या उठवल्या जात आहेत यात कोणतेही तथ्य नसून मी कोणत्याही पक्षाच्या कळपात जाणार नसून मी आगामी विधानसभा निवडणुक अपक्ष लढवणार आहे अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी ‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना दिली आहे.

माझे सगळ्याच राजकीय पक्षांशी हितसंबंध चांगले आहेत. कोणत्याही राजकीय नेत्याच्या संपर्कात आलो म्हणजे लगेच मी त्यांचा झालो असा गैरसमज मनातून काढून टाकावा. तसेच ज्या कोणा पक्षाचे बोलावणे येईल त्यावर विचार होईल मात्र शक्यतो मी निवडणूक अपक्षच लढवणार आहे त्यामुळे उगाच अफवांवर विश्वास ठेवू नये असे ही लंकेंनी जाहीर केले .

आमदार तुकाराम कातेंवरचा हल्ला ‘या’ शिवसैनिकाने परतवून लावला