पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली

ज्योती देवरे

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे ऑडीओ क्लिपमुळे चर्चेत आल्या होत्या. पण आता ज्योती देवरे यांची जळगावला बदली करण्यात आली आहे. त्यामुळे नगरमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार नीलेश लंके व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. या भावनिक क्लिपमुळे राज्यातील राजकारण तापले होते. आमदार लंकेंवर भाजपकडून आरोप करण्यात आले होते.

देवरे यांच्या विरोधात वातावरण तापले होते. देवरे यांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते त्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठविला होता. तसेच क्लिपची चौकशीचा अहवालही वरिष्ठांना पाठविला होता. त्यानुसार देवरे यांच्या बदलीचा आदेश आज राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांना काढला आहे. त्यानुसार देवरे यांची बदलीचा आदेश निघाला आहे. त्यांना १४ सप्टेंबरपासून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असून तातडीने नव्या ठिकाणी पदभार स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी देवरे यांची बाजू लावून धरली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार लंके यांना अडचणीत पकडण्याचाही यावरून प्रयत्न झाला होता. मात्र, आता सरकारने देवरे यांची बदली केल्यामुळे विरोधकांची भूमिका काय असेल, हे लवकरच कळेल.

महत्वाच्या बातम्या