fbpx

सभापती प्रशांत गायकवाड यांचा कारभार मनमानी, संचालकांचे अजित पवारांपूढे गाऱ्हाणे

टीम महाराष्ट्र देशा : पारनेर कृषी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांचा कारभार मनमानी असून संचालकांना कुठल्याही स्वरूपात विश्वासात घेतले जात नाही तसेच निवडीनंतर एक वर्षाचा कार्यकाळ दिला असताना आज तीन वर्षे लोटूनही पदावरून बाजूला जात नाही. असे गाऱ्हाणे घेवून संचालक मंडळ थेट अजित पवार यांच्या दरबारी गेले.

सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेवून बंद खोलीत अर्धा तासाची चर्चा केली. आणि अजित पवार यांच्यासमोर राजीनाम्याची घोषणा केली आहे . तसेच सभापती हटवण्याची मुख्य मागणीही केली आहे. यावर अजित पवार यांनी शिष्टमंडळास आठ दिवसात तोडगा काढतो असा शब्द दिला आहे.

दरम्यान, या संचालक मंडळात उपसभापती विलास झावरे , संचालक गंगाराम बेलकर , अरूण ठाणगे , राजेश भंडारी , राहूल जाधव , विजय पवार , सोपान कावरे , खंडू भाईक , मिराताई काळे यांचा समावेश होता.