निलेश लंके गट यशस्वी होण्याच्या मार्गावर !

पारनेर : स्वप्नील भालेराव – शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची होणारी निवड प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या गटाचे जास्त नगरसेवक असतानाही सत्ता खेचण्यात निलेश लंके यांचा गट यशस्वी होण्याची शक्यता  अधिक आहे.

तब्बल दहा नगरसेवक पळवून नेण्यात अपक्ष उमेदवार यशस्वी झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना मोठा धक्का देण्याची हिंमत अपक्ष उमेदवारात झाली कशी, असा प्रश्न तालुक्यातून व्यक्त होत आहे. यामागे शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष निलेश लंके यांचाच हात असल्याची चर्चा आहे.