fbpx

प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे पारनेर मधील 50 गावांची पाण्याअभावी तडफड….!!!

स्वप्नील भालेराव\पारनेर : पारनेर तालुका म्हणुन ओळखला जाणारा पारनेर सध्या पाण्याअभावी होरपळून गेलेला आहे. विहींना पाणी नाही , जनावरांना चारा नाही यातच प्रशासनाकडून कुठल्या हालचाली दिसत नसतानाच मीना डाव्या कालव्यातून तब्बल 65 दिवसांचे आवर्तन यंदा कुठल्याही परिस्थितीत पारनेर मधील कालव्याच्या लगत असलेल्या सुमारे पन्नास गावांना पाण्याअभावी प्रशासनाने वेठीस धरल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासना विरूद्ध असंतोष पसरलेला आहे. पारनेर तालुक्यातील जगप्रसिद्ध ठिकाण असलेले निघोज येथील रांजणखळगे अक्षरशः कोरडेठाक पडलेले असून यात्रेच्या काळात कुंडात नेहमी प्रमाणे का पाणी सोडले नाही असा सवाल ग्रामस्थांनी प्रशासनापुढे मांडलाय . या संदर्भात अण्णा हजारे यांचे निवेदन तसेच जिल्हाधिकारी यांचे ही निवेदन असताना सबंधित भागात पाणी न सोडल्याने कालव्यालगतची पन्नास गावे अक्षरशः पाण्यावाचून तडफडत आहेत.

पारनेर तालुक्यात 131 गावांपैकी 75गावांत पाण्याचे टॅकर सध्या सुरू असून खाजगी 120 व शासकीय फक्त 4 टॅकर मधून पाणी पुरवठा केला जातोय . जवळजवळ 178956 लोकसंख्येस दररोज 270 प्रमाणे पाण्याच्या प्रतिदिन खेपा होत आहेत . यात काही गावांनी पुढाकार घेवून मोफत पाणी वाटप करण्याचे सहकार्य दाखवले आहे. सध्या पारनेर मध्ये भीषण स्वरूपात पाणीबाणी असताना पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून ही पारनेर मधील काही गावांत पारनेर पाणीदार करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. पारनेर मध्ये तुरळक ठिकाणी चाराछावण्या उभारल्या असून त्यांच्याही चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. पारनेर पश्चिम भागातून कुकडी नदी गेल्याने मात्र अजून ही पिंपळगाव जोगा तून पाणी न सोडल्याने नदीकाठच्या उस शेतीवर मोठे संकट आले आहे . जवळपास सर्रास ऊसाची शेती जळून खाक चालली असताना प्रशासन काय करतय असा सवाल जनतेला पडतोय. यात शेतकरी मात्र होरपळून निघतोय यात शंका नाहीय.