पारनेर तालुक्यातील ५ पैकी ४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

टीम महाराष्ट्र देशा / प्रशांत झावरे : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला असून, पाच पैकी चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर एका जागेवर कम्युनिस्ट पक्षाचा विजय झाला आहे.

वाडेगव्हान, यादववाडी, मावळेवाडी, काकनेवाडी या चार ग्रामपंचायतींमध्ये आमदार विजय औटी समर्थकांनी दणदणीत विजय मिळविला असून, कान्हूर पठार येथे माजी जिल्हा परिषद सदस्य व कम्युनिस्ट नेते अँड.आझाद ठुबे यांचे समर्थक गोकुळ काकडे हे सरपंचपदी निवडून आले आहेत. आमदार विजय औटी समर्थकांनी यावेळी एकच जल्लोष केला. यावेळी विजयी झालेल्या मेदवारांचा शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले व जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते यांनी सत्कार केला.

You might also like
Comments
Loading...