fbpx

पारनेरच्या नगराध्यक्षा सौ.वर्षाताई यांना राज्यस्तरीय बेस्ट नगरसेवक पुरस्कार जाहीर

अहमदनगर / स्वप्नील भालेराव : पारनेर नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. वर्षाताई शंकरराव नगरे यांना लोकसत्ता संघर्ष राज्यस्तरीय बेस्ट नगरसेवक पुरस्कार जाहीर झाला असून उद्या 19 रोजी अहमदनगर येथे माऊली सभागृहात माजी राज्यमंत्री अनिल भैंंय्या राठोड व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

याचबरोबर पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संभाजी झावरे यांनाही आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार मिळाला आहे. लोकसत्ता संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये जीवनगौरव, समाजरत्न, समाजभूषण, लोककलावंत सहकार अर्थविश्व असे पुरस्कारही देण्यात येणार आहेत.

माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्र देशात दुसरा!

आम्ही माफिया नाही व्यावसायिक आहोत : भाऊसाहेब आंधळकर