सकल मराठा समाज आणि इतर संघटनांकडून पारनेर तालुका बंदची घोषणा

parner

पारनेर /स्वप्नील भालेराव : सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालये, सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा इत्यादी गुरुवार दि.२६ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील निवेदन पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना दिले आहे.

मराठा क्रांती मोर्चा : उद्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे बंदची हाक

मराठा आंदोलकांनो सबुरीने घ्या : सुभाष देशमुख

मराठा क्रांती मोर्चा : आणखी तीन आंदोलकांचा आत्महत्येचा प्रयत्न

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.