आघाडीची डोकेदुखी वाढली; महाराष्ट्रात आप डझनभर पक्षांना सोबत घेत लोकसभा निवडणुकीत उतरणार

blank

टीम महाराष्ट्र देशा- सर्व विरोधी पक्ष महागठबंधनात अडकवून घेत काँग्रेसला मोठे करण्याची तयारी करीत असताना महाराष्ट्रात मात्र आघाडीसामोरच्या अडचणी वाढल्या आहेत. ‘आम आदमी पक्षाने 12 पेक्षा अधिक पक्षांना सोबत घेत लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आम आदमी पार्टीने केवळ याच तत्वावर एका समाजिक आर्थिक परिस्थितीच्या आधारे कॉंग्रेस-भाजपा या सापनाथ-नागनाथांना ठेचून दिल्लीत ७० पैकी ६७ जागा जिंकून सत्ता मिळवली. ३ वर्षातच दिल्ली सरकारने प्रशासनाचा आदर्श नमुना Delhi Model of Development निर्माण केला.. महाराष्ट्रात हेच मॉडेल राबविण्यासाठी पुरोगामी शक्तींनी एकत्र या लढाईत आल्यास व्यवस्था परिवर्तनाचे काम होऊ शकते.ह्या उदेशाने महाराष्ट्रातील संविधानावादी आणि लोकशाहीप्रेमी पक्ष-संघटनांची एक नवीन आघाडी महाराष्ट्र समृद्ध आघाडी निर्माण करण्यात आली आहे.

जनसुराज्य पार्टी, विदर्भ माझा, बहुजन रिपब्लिक सोशालीस्त पार्टी, खोब्रागडे रिपब्लिकन पार्टी, बच्चू कडू यांची प्रहर जनशक्ती, श्रीहरी अणे यांची विदर्भ राज्य आघाडी, वामनराव चटप यांची विदर्भ राज्य आंदोलन समिती, नाग विदर्भ आंदोलन समिती आणि जांबुवंतराव धोटे विचार मंच,वेल्फअर पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, धर्मराज्य पक्ष, बहुजन क्रांती पक्ष, देशभक्ती पार्टी, संविधान मोर्चा, एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी हे घटक पक्ष आघाडीत सामील झाले आहेत. तर सत्यशोधक कम्युनिस्ट आणि रघुनाथ दादांच्या शेतकरी संघटनेसोबत बोलणी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान,आम आदमी पार्टी मुंबई,पुणे, भिवंडी, बलाढाणा, यवतमाळ, नागपूर अशा दहा जागा लढविणार आहेत , पुणे लोकसभेबाबत ही तयारी चालू आहे. आघाडीतील अन्य पक्षांसह एकूण वीस जागा समृद्ध महाराष्ट्र आघाडी लढविणार आहे.