fbpx

आई आणि पत्नीला विधवेच्या रुपात कुलभूषण जाधव यांच्या समोर पाकिस्तानने नेलं – स्वराज

sushma swaraj

टीम महाराष्ट्र देशा- कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीच्या आधी माणुसकीचा दाखला देत पाकिस्तानने या भेटीचा डंगोरा पिटला होता मात्र या भेटीत माणुसकी आणि सद्भावना यापैकी कशाचाही पत्ता नव्हता अशा शब्दात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यांनी पाकिस्तानवर हल्ला चढवला .कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीसोबतच्या पाकिस्तानातील भेटीसंदर्भात गुरूवारी राज्यसभेत निवेदन दिले. आई आणि पत्नीला विधवेच्या रुपात कुलभूषण जाधव यांच्या समोर पाकिस्तानने नेलं या मुद्द्यावरून देखील सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर कडाडून टीका केली.

आई-पत्नीला विधवेप्रमाणे कुलभूषण यांच्यासमोर नेलं!
पण या भेटीत पाकिस्तानने दिलेली वागणूक हा खेदाचा विषय आहे. पाकिस्तानने हा प्रचाराचा मुद्दा बनवला. जाधव यांची आई फक्त साडी नेसते, त्यांचेही कपड बदलण्यात आले. त्यांना साडीऐवजी सलवार-कुर्ता परिधान करण्यास भाग पाडलं. इतकंच नाही तर त्यांची टिकली आणि मंगळसूत्रही काढायला लावलं. याबाबत मी कुलभूषण जाधव यांच्या आईशी चर्चा केली. आईला पाहिल्यानतंर कुलभूषण यांनी पहिला प्रश्न विचारला की, बाबा कसे आहेत? त्यांच्या अनुपस्थितीत कोणती अशुभ घटना तर घडली नाही ना, असं कुलभूषण यांना वाटलं. आई आणि पत्नी या दोन्ही सौभाग्यवतींना पाकिस्तानने विधवेप्रमाणे कुलभूषण यांच्यासमोर नेलं असं सुषमा स्वराज म्हणाल्या