पार्ले कंपनी पुढच्या 3 आठवड्यात 3 कोटी बिस्किट पुडे वाटणार

मुंबई : देशातील कोरोनाबधितांचा सातत्याने वाढत असलेला आकडा आणि जगातील इतर देशात निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे गरिबांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर पार्ले कंपनी प्रत्येकी एक आठवड्यात 1 कोटी बिस्किट पुड्यांची वाटप करणार आहे. देशात पुढचे 3 आठवडे लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनपर्यंत पार्ले कंपनी गरिबांसाठी बिस्किट पुड्यांची वाटप करणार आहे. असे वृत्त ‘tv9 मराठी’ ने दिलं आहे.

तसेच घराबाहेर पडलं नाही तर पोट कसं भरणार? असा प्रश्न अनेक मजूर आणि रस्त्यांवर राहणाऱ्यांना पडत आहे. लॉकडाऊन दरम्यान रस्त्यांवर राहणारे किंवा हातावरती पोट असणारे नागरिक यांच्यापर्यंत अन्न पोहचावं या उद्देशाने पार्ले कंपनीने ही घोषणा केली.

दरम्यान, केंद्र सरकारने देशातील 80 कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती 27 किलो रुपयांचे गहू अवघ्या 2 रुपयांना आणि प्रती किलो 34 रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त 3 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे.