पार्किंगच्या कारणावरून तरुणांनी केली तीन गाड्यांची तोडफोड

अभिजित कटके

पुणे-  पार्किंगच्या कारणावरून वाकडमधील गुजरनगर येथे दोघांनी उभ्या असलेल्या तीन गाड्या फोडल्या. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. याबाबत सुदर्शन कसबे (रा. गुजरनगर) यांनी वाकड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तोडफोड करणा-या दोघांना वाकड पोलिसांनी पकडले आहे. समीर शेख (वय 19, रा. गुजरनगर) आणि जुबेर खान (वय 18, रा. महाराष्ट्र कॉलनी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख आणि जुबेर शेख या दोन तरुणांनी गुजरनगर येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास पार्किंग करण्याच्या कारणावरून तीन वाहनांवर दगड मारून वाहनांचे नुकसान केले. यामध्ये सुदर्शन कसबे यांची एक गाडी फोडण्यात आली. त्यानुसार कसबे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. प्रकरणातील दोन्ही आरोपींना वाकड पोलिसांनी पकडले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Loading...