प्रमुख रस्त्यांवर एका तासासाठी 30 रुपये पार्किंग शुल्क

Parking fee of 30 rupees for one hour

पुणे : पुणे शहरातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता यासह अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पुन्हा पे अ‍ॅन्ड पार्क योजना राबविण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. या रस्त्यावर पार्किंगसाठी प्रतितास तब्बल 30 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दुचाकीसह चारचाकी वाहनासाठी ही पार्किंग सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत या योजनेचे ‘आयटीडीपी’ कंपनीने सादरीकरण केले.

अरुंद रस्ते आणि खासगी वाहनांची वाढती संख्या यामुळे रस्त्यावर वाहनाचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रस्तेच वाहनासाठी कमी पडत आहे. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या योजनेसाठी अती वर्दळ, मध्यम वर्दळ तसेच कमी वर्दळ असे रस्त्यांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार, प्रत्येक भागातील रस्त्यासाठी पार्किंग शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे.

शहरातील रस्त्यांचे चार भाग करण्यात आले आहेत, यामध्ये अ, ब, क, ड असे भाग करण्यात आले असून, ‘अ’ भागात वाहनांचे पार्किंग करणाऱ्यांकडून सर्वाधिक शुल्क घेतले जाणार आहे. त्या खालोखाल ‘ब’, ‘क’, ‘ड’ रस्त्यांवर पार्किंगचे शुल्क घेतले जाणार आहे.Loading…
Loading...