योगी आदित्यनाथानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होमग्राउंड नागपूरमध्ये झटका

टीम महाराष्ट्र देशा: उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जोरदार धक्का देत सपाचे उमेदवार विजयी झाले. देशभरात भाजपची जोरदार लाट असतानाही उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्याने भाजप काहीशी बॅकफुटवर गेल्याच दिसत आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील जोरदार धक्का बसला असून त्यांचे होमग्राउंड असणाऱ्या नागपूर महापालिकेच्या कर्मचारी संघटना निवडणुकीत भाजपप्रणित पॅनेल पराभूत झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार असताना त्यांची नागपूर महापालिकेतील नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. दरम्यान, या संघटनेच्या वर्चस्वासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये शिक्षक संघटनेचे राजेश गवरे यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनेलचा विजय झाला आहे. तर भाजप प्रणीत ‘अपना पॅनेल’ला पराभवाला समोर जाव लागले आहे. परिवर्तन पॅनेलचे ४२ तर अपना पॅनेलचे ३२ सदस्य निवडून आले आहेत.

Loading...

विशेष म्हणजे मागील १५ वर्षापासून नागपूर महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. तर संघाचे मुख्य कार्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्र्यांचे होमग्राउंड असल्याने नागपूरला भाजपचा गड मानले जाते. त्याच नागपूरमध्ये भाजपप्रणीत आघाडीचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...तर भारतातील ४० कोटी लोकांना होऊ शकते कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
नांगरे पाटील 'अॅक्शन मोड'मध्ये, आता बाहेर पडूनच दाखवा
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारत कोरोनाच्या स्टेज-३मध्ये गेला असण्याची शक्यता: कोरोना टास्क फोर्स संयोजक डॉक्टरचा दावा
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
भारताचा मित्र असलेल्या ‘या’ राष्ट्रात चीनपेक्षा जास्त लोकांना झालाय संसर्ग
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती