राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील दीक्षांत संचलन सोहळ्याला पालकांना मुकावे लागणार

National Defense Academy

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून, सन्मानपूर्वक लष्करात सामील होणाऱ्या मुलांना पाहून त्यांच्या पालकांना नक्कीच अभिमान वाटतो. प्रबोधिनीत दरवर्षी लष्करी परंपरेनुसार संपन्न होणारा दीक्षांत संचलन सोहळा पाहण्यासाठी प्रशिक्षणार्थींचे पालक आवर्जून हजेरी लावतात. यंदा मात्र प्रशिक्षणार्थींच्या पालकांना या क्षणाला मुकावे लागणार आहे. येत्या शनिवारी (दि.30) अत्यंत साधेपणाने होणाऱ्या दीक्षांत संचलन सोहळ्यासाठी पालक उपस्थित राहणार नसल्याची माहिती प्रबोधिनीतर्फे देण्यात आली आहे.

देशात पसरलेल्या कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदा दीक्षांत संचलन सोहळा अत्यंत साधेपणाने होणार असल्याची माहिती प्रबोधिनीतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. हा सोहळा नेमका कसा होईल, याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून प्रभोधिनीतर्फे मार्च महिन्यापासूनच बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

दरम्यान दरवर्षी मे महिन्यात होणाऱ्या उन्हाळी तुकडीच्या दीक्षांत संचलन यंदा अत्यंत साधेपणाने होणार असून, कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत, प्रशिक्षणार्थींच्या पालकांनाही निमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यामुळेच प्रशिक्षणार्थींच्या पालकांना यंदा या अभिमानाच्या क्षणाला मुकावे लागणार आहे.

#coronavirus : शाळा, कॉलेज उघडणार? केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवं स्पष्टीकरण

अखेर नांदेडचे ‘ते’ ३८ मजूर पुण्याहून रवाना

ऑनलाईन शेतमालाच्या विक्रीतून शेतकरी गटाने दिले कोरोना लढ्याला बळ !