खासगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट

vinod tawade maharashtra desha

मुंबई : मुंबईतील काही खासगी शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे .राज्य शिक्षण मंडळाने दहावी बोर्डाच्या परीक्षेची नियमित फी ३७५ रुपये निश्चित केली आहे. मात्र, अनेक शाळा विद्यार्थ्यांकडून तब्बल दीड हजार रुपये फी आकारणी करण्यात येत असून यात खासगी शाळांचा समावेश सर्वाधिक आहे. तसेच या शुल्काची पावती देखील देत नसल्याचे समोर आले आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षेसाठी सध्या ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही नोंदणी करताना विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी म्हणून ३७५ रुपये आकारण्यात यावेत, असे परिपत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. तरी देखील शाळांकडून अतिरिक्त रक्कम घेऊन पालकांची लूट करण्यात येत आहे.