fbpx

परभणी एक्झिट पोल ; शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादी उध्वस्त करणार

टीम महाराष्ट्र देशा :  साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत असणाऱ्या पक्षांच्या संभाव्य विजयी उमेदवारांची आकडेवा बाहेर येऊ लागली आहे.

दरम्यान, ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोल नुसार गेल्या ३० वर्षांपासून शिवसनेचे वर्चस्व असणाऱ्या परभणी लोकसभा मतदार संघात सत्ता बदल होणार असल्याचे दिसून आले आहे. एक्झिट पोल नुसार परभणीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर शिवसेनेचा झेंडा उतरवून राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे, परभणी लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. परंतु आज पर्यंतचा इतिहास पाहता, एकदा निवडून आलेला खासदार पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावरून निवणूक लढवत नसून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो. मात्र शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी हा इतिहास मोडला असून त्यांनी शिवसेनेतूनच दुसऱ्यांदा उमेदवारी मीळवली आहे. परंतु ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोल नुसार या निवडणुकीत संजय जाधव यांचे पारडे पराभवाकडे झुकले आहे. तर आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांचे पारडे विजयाकडे झुकले आहे.

यंदाच्या निवडणुकीत परभणीत शिवसेनेचा परभव करत राष्ट्रवादीने बाजी मारली तर, शिवसेनेला खूप मोठा धक्का मानला जाणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून परभणीत शिवसेनेचा भगवा फडकत आहे.