fbpx

परभणी शिवसेना आमदाराला चोर म्हणणारे भाजप जिल्हाध्यक्ष सोशल मिडीयावर ट्रोल

टीम महाराष्ट्र देशा :  परभणी शिवसेना आमदार राहुल पाटील यांना चोर म्हणणारे भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांना पाटील समर्थकांनी सोशल मिडीयावर ट्रोल केले आहे. का हो गावचा विकास देखवत नाही का, पाच वर्षे कधी नाही घेतली पत्रकार परिषद. अशा अनेक टीका पाटील समर्थकांनी सोशल मिडियावरून केल्या आहेत.

विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषद घेत परभणीचे शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्यावर निशाणा साधला. आमदार राहुल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा प्रचार केला. राहुल पाटील यांनीच शिवसेना उमेदवार संजय जाधव यांच्या विरोधात काम केल्याने या मतदारसंघात शिवसेनेची पीछेहाट झाली असून आता ते कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जाणार. अशी टीका आनंद भरोसे यांनी केली. इतकेच नव्हे तर आम्ही आणलेल्या निधीचे श्रेय घेऊन उद्घाटन करण्याचा सपाटा त्यांनी लगावला आहे. ते चोर व गद्दार आहेत असा घणाघाती आरोपही त्यांनी केला होता.

आनंद भरोसे यांनी आमदार राहुल पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर पाटील समर्थकांनी भरोसे यांच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले.

१) का हो गावचा विकास देखवत नाही का. पाच वर्षे कधी नाही घेतली पत्रकार परिषद. २) पक्षा चे तिकीट आणा घरची भक्कर खाऊन तुम्हाचा प्रचार करू, बघूच द्या तुमच्या शब्दात किती वजन आहे. ३) जिस रेस से मुझे निकालने की बाद करते थे ,बेवकूक ,वो नही जानते उस रेस का सिकंदर मैं हुँ…आमदार डॉ राहुल पाटिल, ४) #संजीवनी_शिक्षण #संस्था_तो_झांकी हैं #पिक्चर_अभी_बाकी हैं ५) "जनता सुज्ञ आहे ओ… म्हनुन तर तुम्हाला विधानसभेला, जिल्हापरिषदला, महानगरपालिकेत नाकारले..६) तिकीटा साठी लाचार होऊन पक्ष बदलणाऱ्यानी तरी पक्ष निष्ठा शिकवू नये. अशा अनेक टीका पाटील समर्थकांनी आनंद भरोसे यांच्यावर केल्या आहेत.