fbpx

शिवसेना आमदाराबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भरोसेंनी आधी ग्रामपंचायतीत निवडून दाखवावं

टीम महाराष्ट्र देशा :  परभणी शिवसेना आमदार राहुल पाटील यांना चोर म्हणणारे भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांना शिवसेना परभणी विधानसभा प्रमुख अंबिका डहाळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना आमदाराबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्षांनी आधी ग्रामपंचायतीत निवडून दाखवावं, असे अंबिका डहाळे यांनी म्हंटले.

परभणी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांचा सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून निषेध व्यक्त करते. आमदार राहुल पाटील यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आनंद भारोसेंनी आधी ग्रामपंचायतीत निवडून दाखवावं आणि मगच आमदार राहुल पाटील यांच्या बद्दल बोलावं, असे आवाहन अंबिका डहाळे यांनी केले.
इतकेच नव्हे तर, आनंद भरोसे हे आमदार राहुल पाटील यांच्या विरोधात अशी बेताल वक्तव्य वारंवार करणार असतील तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा देखील अंबिका डहाळे यांनी दिला.

काय आहे प्रकरण?

परभणी भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषद घेत परभणीचे शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्यावर निशाणा साधला. आमदार राहुल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा प्रचार केला. राहुल पाटील यांनीच शिवसेना उमेदवार संजय जाधव यांच्या विरोधात काम केल्याने या मतदारसंघात शिवसेनेची पीछेहाट झाली असून आता ते कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जाणार. अशी टीका आनंद भरोसे यांनी केली. इतकेच नव्हे तर आम्ही आणलेल्या निधीचे श्रेय घेऊन उद्घाटनही करण्याचा सपाटा त्यांनी लगावला आहे. ते चोर व गद्दार आहेत असा घणाघाती आरोप त्यांनी केला होता.