परभणी : पेडगावातून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त, ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

Parbhani Police Seized Two live cartridges from Pedgaon one Arrested

परभणी : पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने पेडगावातून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे शुक्रवारी रात्री जप्त केली. गुरुवारी रात्रीच शहरातून एक देशी बनावटीचे पिस्तूल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले होते. त्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी पुन्हा एक गावठी कट्टा जिवंत काडतुसासह सापडल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे.

विशेष पथकाचे फौजदार चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले यांना परभणी तालुक्यातील पेडगाव येथे एका व्यक्तीने बेकायदेशीररीत्या बंदूक बाळगल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून फौजदार खोले व फौजदार पवार यांनी पोलिस अधीक्षक मीना यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांसह शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास पेडगावात छापा टाकून जावेद खान यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या