इंधनदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे परभणीत रिक्षा ओढो आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा :  वाढत्या इंधनदरवाढीच्या विरोधात परभणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने रिक्षा ओढो आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

Loading...

पेट्रोल आणि डिझेलचा दर वाढत जात आहे. या वाढत्या इंधनदरवाढीच्या त्रासाला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. दरम्यान वाढत्या इंधनदरवाढीच्या विरोधात परभणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने रिक्षा ओढो आंदोलन केले.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असे हे रिक्षा ओढो आंदोलन करण्यात आले. डिझेल ७०.३८ तसेच पेट्रोलचा दर ८०.४१ प्रतीलिटर, इंधन दरवाढीचा जाहीर निषेध अश्या आशयाचे फलक हातात घेत हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शांतीस्वरूप जाधव, गंगाधर जवंजाळ, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष sumant वाघ, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सिद्धांत हाके, रितेश काळे, किरण तळेकर, अक्षय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.Loading…


Loading…

Loading...