परभणी महापालिका काँग्रेसच्या ताब्यात; महापौरपदी अनिता सोनकांबळे

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील सत्तांतराचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. परभणी महानगरपालिकेवर ही शिव महाआघाडीचा परिणाम दिसून आला यामुळे परभणी महानगर पालिकेची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात आली. महापौर निवडणुकीत काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे विजयी झाल्या. तर भाजपच्या मंगला मुदगलकर यांना पराभव स्वीकारावा लागला.

मोठे चुरशीचे ठरलेली महापौरपदाची निवडणूक काँग्रेसने बाजी मारत काबीज केले. राष्ट्रवादीने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला. अनिता सोनकांबळे यांना 37 मते मिळाली तर भाजपच्या मंगल मुदगलकर यांना यांना केवळ आठ मते मिळाली तर शिवसेनेचे चार नगरसेवक तटस्थ राहिले.

याशिवाय राष्ट्रवादीतील 10 नगरसेवकाचा गट ही तटस्थ राहिला. तर दुसरा गट हा काँग्रेससोबत होता यामुळेच सहजरीत्या Oकाँग्रेसला महापौरपद आपल्या ताब्यात घेता आले.

असे झाले मतदान

काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे (37 मते)
भाजपाच्या मंगल मुदगलकर पराभूत (8 मते)
शिवसेना तटस्थ 4
राष्र्टवादीचा एक गट तटस्थ तर (10)
दुसरा गट काँग्रेसबरोबर

महत्वाच्या बातम्या