भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत –  राष्ट्रवादी 

भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत –  राष्ट्रवादी 

paramvir

मुंबई  – तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन हीरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केले. जेव्हा NIA केव्हाही अटक करु शकते अशी भीती निर्माण झाल्यावर परमवीरसिंग यांनी भाजपसोबत ‘डील’ केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

NIA च्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद असल्याचे लक्षात आल्यानंतर परमवीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याचे काम केले. त्या ‘डील’ मुळे NIA ने परमवीरसिंग यांना आरोपी केलेले नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र आता भाजप NIA ला अधिकार आहेत कुणाला आरोपी करायचं आणि कुणाला नाही हे सांगत आहेत हे एकदम हास्यास्पद असल्याचा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टनं धक्कादायक माहिती दिली आहे. परमबीर सिंह यांनी अॅंटिलिया कांड प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिन्द नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा एक्सपर्टनं केला आहे. यासाठी परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच दिली असल्याचंही त्यानं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या