शबनमला फाशी दिली तर अनर्थ ओढावेल; महंत परमहंसांचा इशारा

shabnam

नवी दिल्ली- स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधील शबनम या महिलेनं २००८ साली आपल्या प्रियकरासोबत आपल्या नात्यातल्या 7 जणांचा कुऱ्हाडीने खून केला होता. या प्रकरणात शबनम अलीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

कुटुंबातील लोकच तिच्या प्रेमात आडकाठी ठरत होते यामुळे शबनमने प्रियकरासोबत मिळून तिने आपल्याच कुटुंबियांना संपविण्याचे दुष्कृत्य केले होते. अमरोहाच्या हसनपूरमधील बावनखेडी गावात २००८ च्या १४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली होती. इथे शबनमने आपला प्रियकर सलीमसोबत मिळून आपले वडील, शिक्षक शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिणी अंजुम आणि चुलत बहीण राबिया यांची कुऱ्हाडीने कापून हत्या केली होती. भाचा अर्शचा गळा आवळला होता.

या क्रूरकर्मा महिलेचा राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला आहे. मथुरा जेलमध्ये तिला फाशी होईल. फाशीच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली आहे. निर्भया प्रकरणातल्या आरोपांना फाशी देणारा पवन जल्लादचीच या फाशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. फाशीची तारीख मात्र अजून निश्चित झालेली नाही.

दरम्यान, महंत परमहंस यांनी एक लक्ष्यवेधी मागणी केली आहे. हिंदू धर्मग्रंथात स्त्रीला पुरुषांपेक्षा महत्त्वाचे स्थान आहे. स्त्रीच्या मृत्यूचा फायदा समाजाला होणार नाही. तसे झाल्यास तुम्ही दुर्दैवी आपत्तींना तोंड द्याल. शबनमचा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. परंतु, एक स्त्री म्हणून तिची फाशीची शिक्षा मागे घेतली पाहिजे, असे महतं परमहंस यांनी सांगितले.

महंत पुढे म्हणाले, ‘हिंदू धर्माचे गुरू असल्याने मी राष्ट्रपतींना शबनम यांची दया याचिका स्वीकारण्याचे आवाहन करतो. तुरुंगात तिच्या गुन्ह्याबद्दल तिने प्रायश्चित भोगले आहे. जर तिला फाशी देण्यात आली तर, हा इतिहासातील सर्वात दुर्भाग्यपूर्ण अध्याय असेल. आमची राज्यघटना राष्ट्रपतींना विलक्षण अधिकार देते, त्यांनी या अधिकारांचा उपयोग माफी देण्यासाठी करायला हवा. ‘

महत्त्वाच्या बातम्या