परमबीर सिंग यांच्या वकिलांचा चौकशी आयोगासमोर मोठा खुलासा; म्हणाले…

परमबीर सिंग यांच्या वकिलांचा चौकशी आयोगासमोर मोठा खुलासा; म्हणाले…

Prambir sigh ad anil deshamukh

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेच्या भीतीने गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अटकेपासून संरक्षण दिलं आहे. तसंच त्यांच्या याचिकेवर बाजू मांडण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकार, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) यांना दिले आहेत.

दरम्यान परमबीर सिंग यांचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी चौकशी आयोगासमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंबंधी आरोपांवर मोठा खुलासा केला आहे. तसंच परमबीर सिंग यांना साक्षीदार म्हणून उभं करण्यात काही अर्थ नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत महाराष्टर सरकराने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती गठीत केली होती. निवृत्ती न्यायाधीश के. यू. चांदीवाल या समितीत आहेत. वकील अभिनव चंद्रचूड परमबीर सिंह यांची बाजू मांडत असून त्यांनी या समितीसमोर ही माहिती दिली आहे.

परमबीर सिंग यांनी दिलेली माहिती ही त्यांना काही अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यांच्याकडे थेट अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याकडून सर्व माहिती ऐकीव आहे. उद्या जरी त्यांना साक्षीदार म्हणून उभं केलं तरी त्याला कोणताही अर्थ नाही कारण ते तेच सांगतील जे त्यांना इतर कोणीतरी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ठोस असं काहीच नाही, असा खुलासा वकील अभिनव चंद्रचूड यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या