सचिन वाझेंवर नियंत्रण ठेवणारे परमबीर सिंगच; बारा जणांचे जबाब

परमबीर सिंग

मुंबई : गुन्हे शाखेच्या चौकशीत परमबीर सिंग यांच्या विरोधात एकूण बारा जणांनी साक्ष दिली आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेचे बॉस होते, त्यांच्या सुचनेनुसारच वाझे काम करायचे, असा जबाब सर्वांनी नोंदविला आहे. सीआयडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व गुन्हे शाखा या परमबिर सिंगांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांचा तपास करत आहेत.

परमबीर सिंग व सचिन वाझे यांच्याविरोधातील जबाब हा गुन्हे शाखेने इनकॅमेरा नोंदविला आहे. त्यामध्ये अँटेलिया घटना, मनसुख हत्या आणि वसूलीप्रकरणात परमबीर सिंग हेच सचिन वाझेंचे बॉस होते. असाच जबाब या १२ साक्षीदारांनी नोंदविला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला खंडणीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हे शाखा परमबीर सिंग यांच्या शोधात आहे. खंडणीच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष चौकशी आवश्यक असल्याने गुन्हे शाखेने परमबीर सिंग यांना नोटीस बजावली होती. मात्र परमबीर सिंग हजर झाले नाहीत.

महत्वाच्या बातम्या